Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? मास्टरमाईंड कोण? हल्ल्याआधी काश्मीरात अतिरेक्यांचा मोठा जलसा अन्…

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? मास्टरमाईंड कोण? हल्ल्याआधी काश्मीरात अतिरेक्यांचा मोठा जलसा अन्…

| Updated on: Apr 26, 2025 | 1:43 PM

फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानच्या काश्मीरमध्ये जगभरातील मोठ्या आणि महत्त्वाच्या अतिरेक्यांचा मेळावा भरलेला होता. यात लष्कर ए तोयबा, जैश सह हमसचे कमांडर आणि अतिरिक्त सहभागी झाले होते. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला सुद्धा याच ठिकाणी उपस्थित होता असा संशय आहे.

पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारी महिन्यातच शिजल्याचं मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. पहलगाम हल्ल्याआधी पाक व्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा सर्वात मोठा जलसा झाल्याचा खुलासा झाला आहे. जगभरातील अतिरेक्यांचा हा भव्य मेळावा पाकिस्तानच्या काश्मीरमध्ये 5 फेब्रुवारीला झाला. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदसह अनेक दहशतवादी संघटना या जलसामध्ये सहभागी झाल्या. या मेळाव्यासाठी जगभरातील अतिरेकी पाकिस्तानच्या काश्मीरमध्ये आले होते. या मेळाव्यामध्ये भारताचे मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सुद्धा सहभागी झाले होते.

मेळाव्याच्या आधी अतिरेक्यांची महागड्या गाड्यांमधून रॅली निघाली. यावेळी अतिरेक्यांनी बाईक रॅली सुद्धा काढली. या मेळाव्यासाठी अतिरेक्यांनी स्टेजही उभारला होता. 26\11 चा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा सुद्धा या मेळाव्याच्या स्टेजवर होता. या मेळाव्यामध्ये हमासच्या अतिरेक्यांचे व्हीव्हीआयपी स्वागत करण्यात आलं. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या तल्लाह सैफ सुद्धा या मेळाव्यामध्ये होता. जैश आणि लष्करचे मोठे कमांडर अतिरेकी मेळाव्याला हजर होते. सुरक्षा यंत्रणांची नजर आता या मेळाव्याच्या खुलाशावर आहे. या मेळाव्यासाठी पाक व्याप्त काश्मीरमध्ये हजारो अतिरेकी आले होते. या मेळाव्यात अतिरेक्यांना भारताविरोधी भडकवण्यात आलं. काश्मीरमध्ये मोठी घटना घडवण्याची चिथावणी अतिरेक्यांना देण्यात आली.

Published on: Apr 26, 2025 01:43 PM