Pahalgam Attack :  पहलगाममध्ये जिथे गोळ्या झाडल्या तिथे 25 -30 सिलेंडर कसे आले? अतिरेक्यांचा मोठा डाव होता?

Pahalgam Attack : पहलगाममध्ये जिथे गोळ्या झाडल्या तिथे 25 -30 सिलेंडर कसे आले? अतिरेक्यांचा मोठा डाव होता?

| Updated on: Apr 25, 2025 | 1:37 PM

पहलगाम येथे हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचे प्रतिनिधी ग्राऊंड रिपोर्ट केलाय ज्या ठिकाणी पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला होता. त्या बैसरन खोऱ्यात सध्या शुकशुकाट पसरलाय

जम्मू काश्मीर येथील पहलगामच्या बैसरन व्हॅली परिसरात २२ एप्रिल रोजी संध्याकाळच्या दरम्यान, काही दहशतवाद्यांनी पर्यंटकांवर भ्याड हल्ला केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर पर्यटकांनी फुललेलं बैसरन व्हॅली हे पर्यटनस्थळ अचानक ओसाड झालं. दरम्यान, पहलगामच्या बैसरन व्हॅली परिसरात ज्या वेळेला पर्यटकांवर गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा तेथील काही लहान हॉटेलमध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बैसरन व्हॅली परिसरात या लहान लहान टपऱ्या, हॉटेल्स पाहायला मिळताय. याच ठिकाणी पर्यटक चहा-पाणी, नाश्ता घेतात. पण ज्यावेळी गोळीबाराची घटना घडली त्यानंतर या लहान लहान टपऱ्या, हॉटेल्सच्या मागे २५ ते ३० सिलेंडर आढळून आलेत. याचा अंदाज असाही बांधला जात आहे की, हॉटेल व्यवसाय़िकांनी हे सिलेंडर टपऱ्या, हॉटेल्सच्या मागे फेकले असावेत. कारण एखादी गोळी सिलेंडरवर लागली असती तर सिलेंडरचा स्फोट झाला असता आणि मोठी आग भडकली असती. बैसरन व्हॅली परिसरात हल्ल्यानंतरची परिस्थिती पाहिली असता ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं असेल याची दाहकता या दृश्यावरून लक्षात येते.

Published on: Apr 25, 2025 01:37 PM