Pahalgam Terror Attack : 20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे

Pahalgam Terror Attack : 20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे

| Updated on: Apr 28, 2025 | 8:59 AM

Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एनआयएच्या तपासाला वेग आला असून यात अनेक नवीन खुलसे समोर आले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एनआयएच्या तपासात नवीन माहिती समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांकडे एके 47 आणि एम4 रायफल होत्या. तसंच हे दहशतवादी जंगलातून जवळपास 20 ते 22 तास चालत बैसरन खोऱ्यात पोहोचले होते. खोऱ्यातल्या दुकानांजवळ ते थांबलेले होते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांकडून वापरण्यात आलेली काडतुस देखील एनआयएकडून जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता या हल्ल्याच्या तपासाला वेग आलेला दिसत आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे असलेल्या बैसरन खोऱ्यात झालेल्या या हल्ल्यात अतिरेक्यांकडून 26 पर्यटकांना गोळ्या घालून मारण्यात आलं होतं.

Published on: Apr 28, 2025 08:58 AM