Pakistan Army : पाकिस्तानी लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे अन्…
अलीकडे पाकिस्तानी लष्करात मोठ्या प्रमाणात बंडखोरीची परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशातच पाकिस्तानी लष्कराने जवानांचे राजीनामे न स्वीकारण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानी लष्करात अंतर्गत बंडाळीची परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे लष्कराच्या मनोधैर्यावर मोठा परिणाम झाला आहे. पाकिस्तानी लष्करामध्ये राजीनाम्याचं सत्र अद्याप सुरूच असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानचे लष्करी जवान घाबरले असून या जवानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आतपर्यंत तब्बल 1 हजार 200 पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर राजीनामे सुरूच असल्याने पाकिस्तानी सैन्याच्या नेतृत्व क्षमतेवर आणि लष्करी मनोबलावर प्रश्न उपस्थित केले आहेत, जे भारत-पाकिस्तान सीमेवर वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी सैनिकांचा मानसिक थकवा, लष्करी अधिकाऱ्यांचे वारंवार बदलणारे आदेश आणि कौटुंबिक दबावामुळे 100 हून अधिक लष्करी अधिकारी आणि 500 हून अधिक जवानांनी सामूहिकरित्या आपल्या पदाचा राजीनामे दिल्याचे पाहायला मिळत आहे. या सामूहिक राजीनाम्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या लष्करी जवानांच्या तैनातीवर मोठा धोका निर्माण झाला आहे. राजीनाम्याचं सत्र सुरू असताना पाकिस्तानी लष्कराने हे संकट गांभीर्याने घेतले असून राजीनामे न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तर राजीनामा देणाऱ्या अधिकारी आणि जवानांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
