Pahalgam Terror Attack : पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला, हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचे मन हेलवणारे व्हिडीओ अजूनही समोर येत आहेत. असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा समोर आला आहे.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचे मन हेलवणारे व्हिडीओ अजूनही समोर येत आहेत. हल्ला झाल्यावर पहलगामच्या स्थानिक लोकांनी पर्यटकांना या ठिकाणाहून बाहेर पडण्यास मदत केली होती. काही पर्यटकांना घोड्यावरून तर काहींना अगदी खांद्यावर उचलून या स्थानिकांनी खाली आणत जीव वाचवले. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. एका छोट्या काश्मिरी मुलाने पर्यटकांच्या बाळाला या हल्ल्यानंतर वाचवलं आहे. यावेळी व्हिडीओमध्ये मागे गोळ्यांचे आवाज येत आहेत. काही पर्यटक आपला जीव वाचवत घोड्यावरून त्या ठिकाणाहून लांब जात असल्याचं दिसून येत आहे. आपल्या कडेवर उचलून या मुलाने त्या बाळाला खाली आणत त्याचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून या काश्मिरी मुलाच कौतुक होत आहे.
Published on: Apr 25, 2025 03:58 PM
