Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; अत्याधुनिक उपकरणासह NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
Pahalgam Terrorist Attack Recreation : 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन करण्यासाठी एनआयएचं पथक बैसरन खोऱ्यात दाखल झालेलं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन करण्यासाठी एनआयएचं पथक बैसरन खोऱ्यात दाखल झालेलं आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन हे अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. एनआयएचे डिजी सदानंद दाते यांनी या संदर्भात बैठक घेतली आहे. या पूर्वी देखील हे रिक्रिएशन करण्यात आलेलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा सर्व अत्याधुनिक उपकरणं वापरुन हे रिक्रिएशन करण्यात येणार आहे. यात जीआयएसचा उपयोग केला जाणार आहे. त्यानुसार घटनास्थळी रिक्रिएशन होईल. ज्या वेळी ही घटना घडली, त्याच दुपारच्या वेळी हे सगळं रिक्रिएशन होणार असून त्याच व्हिडीओग्राफी देखील करण्यात येणार आहे. या रिक्रिएशनमधून आता नवीन काही उलगडा होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Published on: May 02, 2025 02:55 PM
