Pahalgam Attack : पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; काश्मीरच्या घनदाट जंगलात शोध सुरू

Pahalgam Attack : पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; काश्मीरच्या घनदाट जंगलात शोध सुरू

| Updated on: Apr 28, 2025 | 4:11 PM

Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम येथे अतिरेकी हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा शोध सध्या लष्कराकडून घेतला जात आहे. या अतिरेक्यांनी आत्तापर्यंत 4 वेळा आपलं लोकेशन बदललं आहे.

पहलगाममध्ये हल्ला केलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग भारतीय लष्कराकडून केला जात आहे. गेल्या 5 दिवसात 4 वेळा या हल्लेखोरांचं लोकेशन लष्कराने शोधून काढलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चारही वेळा हे दहशतवादी दाट जंगलातून पळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर हे हल्लेखोर अजूनही काश्मीरच्या खोऱ्यातच असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. काश्मीरच्या या दाट जंगलात सध्या या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. या जंगलात दहशतवाद्यांनी आपलं लोकेशन 4 वेळा बदललं आहे. लष्कराकडून या दहशतवाद्यांचा शोध युद्ध पातळीवर घेतला जात आहे.

Published on: Apr 28, 2025 04:11 PM