Bahawalpur Terror Camps : राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले

Bahawalpur Terror Camps : राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले

| Updated on: Apr 25, 2025 | 3:22 PM

Jaish-e-Mohammed camps near Rajasthan : पहलगाम हल्ल्यानंतर पाक आणि भारताच्या संबंधात तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच आता राजस्थान जवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ  बांधले असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

राजस्थानपासून 100 किलोमीटरवर असलेल्या बहावलपुर येथे पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ  बांधले आहेत. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या या माहितीनंतर बीएसएफ सतर्क झालं आहे. तसंच पाक सैन्याचा शस्त्रसाठा कारखाना देखील याच भागात असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आता राजस्थानी सीमेजवळ भारतीय लष्कराच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी मोठी बैठक देखील काल घेतली आहे. संशयितांणा पकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Published on: Apr 25, 2025 03:22 PM