Pakistan : पाकचा लष्कर प्रमुखच ‘पहलगाम’चा मास्टरमाईंड, असीम मुनीरबाबत कोणी केले खळबळजनक खुलासे?

Pakistan : पाकचा लष्कर प्रमुखच ‘पहलगाम’चा मास्टरमाईंड, असीम मुनीरबाबत कोणी केले खळबळजनक खुलासे?

| Updated on: May 29, 2025 | 11:52 AM

आपलं पद वाचवण्यासाठी असीम मुनीर याने पहलगाम हल्ल्याचा कट रचला. यासाठी असीम मुनीरला फील्ड मार्शल पदावर बढतीही मिळाली. पाकमधील लष्कराच्या माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हाच पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. इतकंच नाहीतर पाकिस्तानी लष्कराचे चार ते पाच उच्च अधिकारी देखील पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. तर पाकिस्तानी लष्कराकडून दहशवाद्यांना पाठिंबा दिला जात असल्याचे पाकिस्तान लष्करातील माजी अधिकारी आदिल राजा यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानमधील लष्करातील माजी अधिकाऱ्याचा हा खळबळजनक खुलासा समोर आल्याने चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

आदिल राजा यांनी काय केले खुलासे?

पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पाठिंबा देतं

पाकिस्तान त्यांच्या हँडलर्सद्वारे भारतात हल्ले घडवून आणतो

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचा हात

मुनीर आपलं पद वाचवण्यासाठी काहीतरी मोठं करू इच्छित होता.

आपलं पद वाचवण्यासाठीच असीम मुनीरने पहलगाम हल्ला घडवून आणला

Published on: May 29, 2025 11:50 AM