Bilawal Bhutto : ‘एकतर सिंधूमध्ये आमचं पाणी वाहील किंवा त्यांचं रक्त….’, मोदींच्या ‘वॉटर स्ट्राईक’नंतर बिलवाल भुट्टोचं चिथावणीखोर वक्तव्य

Bilawal Bhutto : ‘एकतर सिंधूमध्ये आमचं पाणी वाहील किंवा त्यांचं रक्त….’, मोदींच्या ‘वॉटर स्ट्राईक’नंतर बिलवाल भुट्टोचं चिथावणीखोर वक्तव्य

| Updated on: Apr 26, 2025 | 12:17 PM

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलवाल भुट्टो यांनी धमकी देत असे म्हटले की, आता एकतर सिंधू नदीत पाणी येईल किंवा त्यांचे रक्त वाहिल. सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील. सिंधू जल करारला स्थगिती दर्शवल्यानंतर बिलवाल भुट्टो यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार थांबविण्यासह पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकाच गेल्यानं पाक चांगलाच थयथयाट करतान दिसतोय. दहशतवादी हल्ल्यानंतरही पाक भारताला सतत धमक्या देत आहे. अशातच पाकिस्तानचे नेते, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलवाल भुट्टो बिलवाल भुट्टो यांनीही धमकी दिली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलवाल भुट्टो यांचं एक चिथावणीखोर वक्तव्य समोर आलं आहे. ‘भारत देशाची लोकसंख्या जास्त असू शकते पण आम्ही धाडसी लोकं आहोत. त्यामुळे एकतर आमचं पाणी नदीत वाहील किंवा त्यांचं रक्त’, असं विधान बिलवाल भुट्टो यांनी केलं आहे.

दरम्यान, सिंधू नदीच्या काठावर झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना बिलवाल भुट्टो म्हणाले की, सिंधू नदीजवळ उभे राहून मला स्पष्टपणे सांगायचे आहे की, सिंधू नदी आमची होती, आमची आहे आणि आमचीच राहील. या नदीतून एकतर आपलं पाणी वाहील, किंवा ज्याला आमचा वाटा हिसकावून घ्यायचा आहे त्याचं रक्त वाहील…

Published on: Apr 26, 2025 11:18 AM