India Pakistan Tension : S-400, ब्रह्मोस बेस सेफ… पाकचा कांगावा, ‘तो’ दावा खोटा; भारतीय लष्कराने दिला पुरावा

India Pakistan Tension : S-400, ब्रह्मोस बेस सेफ… पाकचा कांगावा, ‘तो’ दावा खोटा; भारतीय लष्कराने दिला पुरावा

| Updated on: May 10, 2025 | 3:21 PM

कुपवाडा, बारामुल्ला, पुंच, राजौरी, अखनूरमध्ये पाकिस्तानने तोफांचा मारा आणि गोळीबार केला. भारतानेही प्रत्युत्तर देत पाकिस्तानला मोठी हानी पोहोचवली. पाकिस्तानने त्यांच्या पूर्व सीमेवर सैन्याची जमवाजमव केली आहे. भारत याला उत्तर द्यायला पूर्णपणे तयार आहे.

मागच्या २ ते ३ दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पुर्ण पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन, लॉन्ग रेंज वेपन्स, तोफगोळे आणि लढाऊ विमानांद्वारे हल्ला करण्यात येतोय. यासह भारतीय लष्करी तळांवर आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानकडून हल्ला केला जातोय. नियंत्रण रेषेवर पाकने ड्रोनने घुसखोरी करत तोफांचा मोठा मारा केला. पाकिस्तान श्रीनगरपासून नलियापर्यंत २६ पेक्षा जास्त ठिकाणी हवाई घुसखोरी केली. भारताने पाकिस्तानचे बहुतांश ड्रोन पाडले. मात्र भारताच्या उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, भुज, भटींडा या लष्करी स्थानकांवर काही उपकरणांची हानी झाली.

दरम्यान, पाकिस्तान हाय स्पीड मिसाईल द्वारे पंजाबमधल्या एअरबेस स्टेशनवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकने श्रीनगर अवंतीपुरा उधमपूरच्या दवाखाने आणि शाळांवर हल्ला केला. पाकिस्तान लाहोर मधून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांचा आसरा घेतला तर पाकिस्तान अंतरराष्ट्रीय हवाई मार्गाचाही दुरुपयोग केला. तर एस ४०० प्रणाली नष्ट केल्याचा खोटा दावा पाकने केला. मात्र आज भारतीय लष्कराने थेट व्हिडीओ जारी करत पाकचा खोटा कांगावा उघड केलाय. आधमपूर येथील एस-४०० ही एअर डिफेन्स सिस्टिम, सुरजगड आणि वासूसाचे विमानतळ, मग्रुराटा येथील ब्रम्होस स्थळ, देहरागिरी येथील तोफखाना आणि चंदीगड येथील दारुगोळा साठ्यांवर हल्ला करून ते नष्ट केल्याचा दावा पाकने केला. हा दाव खोटा असल्याचे भारतीय लष्कराने सांगितले.

भारतीय लष्कराकडून पोलखोल, थेट लावला व्हिडीओ अन् सांगितलं काय खरं काय खोटं

Published on: May 10, 2025 03:19 PM