Pakistan : पाकड्यांची पिडा संपेना…जाफर एक्स्प्रेसमध्ये स्फोट 4 डब्बे घसरले, 3 महिन्यांपूर्वी हीच ट्रेन हायजॅक अन् आता…

Pakistan : पाकड्यांची पिडा संपेना…जाफर एक्स्प्रेसमध्ये स्फोट 4 डब्बे घसरले, 3 महिन्यांपूर्वी हीच ट्रेन हायजॅक अन् आता…

| Updated on: Jun 18, 2025 | 1:12 PM

पेशावरहून क्वेट्टाला जाणारी जाफर एक्सप्रेस स्फोटानंतर रुळावरून घसरली. ११ मार्च रोजी बलुच्यांनी याच ट्रेनला हायजॅक केले होते. ५०० प्रवाशांसह क्वेट्टाहून पेशावरला सकाळी ९ वाजता ही एक्स्प्रेस निघाली होती.

पाकिस्तानमध्ये आज बुधवारी एक मोठा रेल्वे अपघात झाला. पाकिस्तानच्या जकोकाबादमध्ये जाफर एक्स्प्रेसमध्ये स्फोट झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. या भीषण स्फोटाच्या घटनेनंतर जाफर एक्स्प्रेसचे चार डब्बे थेट रूळावरून खाली घसरल्याची माहिती मिळतेय. पेशावरवरून क्वेटाला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेस ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रेनचे ४ डबे रुळावरून घसरले आहेत, ही दुर्घटना पाकिस्तानातील जकोकाबादजवळ घडली. या घटनेत कोणत्याही जीवितहानी झालेली नाही. जेकबाबादच्या रेल्वे ट्रॅकवर झालेल्या या स्फोटामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेत. सध्या या अपघाताची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, आज झालेल्या जकोकाबादमधील जाफर एक्स्प्रेसमधील स्फोटाच्या या घटनेने पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका मोठ्या घटनेची आठवण करून दिली आहे. त्याचे कारण म्हणजे ३ महिन्यांपूर्वी या जाफर एक्सप्रेसला बलुच्यांकडून हायजॅक करण्यात आले होते.

गेल्या वेळी जेव्हा जाफर एक्सप्रेस क्वेट्टाहून पेशावरला जात होती, तेव्हा बीएलए (Balochistan Liberation Army) च्या लोकांनी एका बोगद्याजवळ स्फोट घडवून आणला होता. तर ट्रेनचा वेग कमी झाल्यावर आणखी काही स्फोट केले होते आणि त्यामुळे ट्रेन रुळावरून घसरल्याची घटना घडली होती. यावेळी पाकिस्तानी सैन्याने दावा केला की त्यांनी बीएलएच्या अनेक लोकांना मारले आहे आणि त्यांच्या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

Published on: Jun 18, 2025 01:02 PM