Pakishan : युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून पाकिस्तान सरकारचा एकच आदेश

Pakishan : युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून पाकिस्तान सरकारचा एकच आदेश

| Updated on: May 02, 2025 | 3:45 PM

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी दावा केला की भारत पुढील २४-३६ तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याची योजना आखत आहे. मात्र खरंच युद्ध होणार की नाही.. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध सतत कठोर कारवाया करत आहे.  भारतीय सैन्य पाकिस्तानविरुद्ध कारवाई करू शकते, अशी पाक सरकारला भीती आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सर्वत्र युद्धाबाबत भीतीचे वातावरण आहे. लढाईच्या भीतीने पाकिस्तान चांगलाचा घाबरला असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताकडून होणाऱ्या सर्जिकल स्ट्राईकची पाकिस्तानने मोठी धास्ती घेतली आहे. युद्धाच्या भितीपोटी अन्नधान्याचा साठा करून ठेवण्याचे पाकिस्तान सरकारने नागरिकांना थेट आदेशच दिले आहे. सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना उपासमारीने जीव गमवावा लागू नये म्हणून पाकिस्तानी सरकारकडून लोकाना सूचना देण्यात आल्या आहेत. पाकव्याप्त नागरिकांना अन्नधान्य साठवण्याचे आदेशच देण्यात आले आहे. यावेळी पाकिस्तानी सरकारने साधारण दोन महिने पुरेल इतका अन्न-धान्य साठा जमा करा असा आदेशच नागरिकांना दिला आहे.

Published on: May 02, 2025 03:43 PM