Shahbaz Sharif : पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर आली! भारतासोबत शांतता चर्चेसाठी तयार; शाहबाज शरीफ यांचं विधान

Shahbaz Sharif : पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर आली! भारतासोबत शांतता चर्चेसाठी तयार; शाहबाज शरीफ यांचं विधान

| Updated on: May 16, 2025 | 1:32 PM

India - Pakistan Conflict : भारताच्या हल्ल्यात प्रचंड नुकसान झाल्यानंतर आता पाकिस्तान वठणीवर आलेला आहे. शांतता चर्चेसाठी तयार असल्याचं शाहबाज शरीफ यांनी म्हंटलं आहे.

भारताच्या हल्ल्यात प्रचंड नुकसान झाल्यानंतर आता पाकिस्तान वठणीवर आलेला आहे. भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार असल्याचं शाहबाज शरीफ याने म्हंटलं आहे. देश शांततेसाठी वाटाघाटी करण्यासही तयार असल्याचं शाहबाज शरीफने सांगितलं आहे. पाकिस्तानच्या सैनिकांशी संवाद साधताना शाहबाज शरीफने हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भारताच्या हल्ल्यात मोठं नुकसान झाल्यानंतर पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर आली असल्याचं बघायला मिळत आहे.

भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानात असलेल्या 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारतावर उलट हल्ला करण्यात आला होता. यावेळी भारताकडून देखील या हल्ल्यानं चोख उत्तर मिळालं. या युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे.

Published on: May 16, 2025 01:32 PM