Pakistan Share Market : युद्धाची भिती अन् पाकिस्तानी शेअर बाजार धाडकन कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
पाकिस्तानमध्ये बुधवारी सकाळी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज (PSX) मध्ये मोठी घसरण दिसून आली. पाकिस्तानमधील शेअर बाजारात देखील युद्धाची भिती पाहायला मिळत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव आहे. पुढील २४-३६ तासांत भारतीय लष्कराकडून हल्ला होऊ शकतो, असा दावा पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी केला. यानंतर भारताशेजारील पाकिस्तानात मोठा तणाव निर्माण झाला आहे. माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी रात्री २ वाजता पत्रकार परिषदेत घेतली. यामध्ये भारत येत्या 24-36 तासांत पाकिस्तानवर लष्करी कारवाई करू शकतो, अशी शक्यता अताउल्लाह तरार यांनी व्यक्त केली. त्यांच्या विधानाचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावर दिसून येत आहे.
पाकिस्तानच्या शेअर बाजारात देखील युद्धाची भीती पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी शेअर बाजार २५०० पेक्षा जास्त अंकांनी घसरल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, युद्धाच्या भितीचं सावट पाकिस्तानी शेअर बाजारावर असून गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात सध्या पैशांची गुंतवणूक करण्याची धास्तीच घेतली आहे. अवघ्या दोन तासात ४६ हजार कोटी पाकिस्तानी रूपयांचे नुकसान झाले आहे.
