CM Fadnavis : पाकिस्तानने गुडघे टेकून फोन केला म्हणून युद्धविराम; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं युद्धबंदीचं कारण

CM Fadnavis : पाकिस्तानने गुडघे टेकून फोन केला म्हणून युद्धविराम; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं युद्धबंदीचं कारण

| Updated on: May 15, 2025 | 10:16 AM

CM Devendra Fadnavis On Ceasefire : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना युद्धबंदीच कारण सांगून पाकिस्तानवर टीका केली आहे.

ब्रम्होसची ताकद पाकिस्तानला माहिती नव्हती, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. युद्धविरामासाठी पाकिस्तानला इतर देशांकडे जावं लागलं. पाकिस्तानने गुडघे टेकून फोन केल्याने युद्धविराम झाला, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘ब्रम्होसची ताकद पाकिस्तानला माहिती नव्हती. त्यांचं एक-एक सैनिकी तळ उद्ध्वस्त झालं, त्यावेळी हाच पाकिस्तान जगाच्या पाठीशी सगळ्या देशांकडे गेला. आता युद्धबंदी करा, आता मध्यस्थी करा. भारताने सांगितलं, पाकिस्तानला युद्धबंदी करायची असेल तर त्यांनी आमच्यापुढे गुडघे टेकावे. त्यांच्या सैनिकी अधिकाऱ्याने आम्हाला फोन करून विनंती करावी. तरच आम्ही युद्धबंदी करू. त्यानंतर पाकिस्तानच्या सेनेला आपल्याला फोन करून विनंती करावी लागली. त्यानंतर ही युद्धबंदी झाली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Published on: May 15, 2025 10:16 AM