Talha Saeed : दहशतवादी हफिज सईदच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल; पाकिस्तानचा बुरखा फाटला

Talha Saeed : दहशतवादी हफिज सईदच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल; पाकिस्तानचा बुरखा फाटला

| Updated on: Jun 06, 2025 | 3:27 PM

Talha Saeed Video : दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात त्याने केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे. 

पाकिस्तान हफिज सईदला कधीही भारताच्या स्वाधीन करणार नाही, असं हफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याचं हे विधान आहे. हफिज सईद हा पाकिस्तान सरकारच्या संरक्षणाखाली असल्याचं देखील तल्हा सईद याने म्हंटलं आहे. पाक हे दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचं सुद्धा त्याने सांगितलं आहे. दरम्यान, तल्हा सईदच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे.

दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तल्हा सईद याने मुलाखतीत स्पष्टपणे म्हंटलं आहे की पाकिस्तान सरकार त्याच्या वडिलांना कधीही भारताच्या स्वाधीन करणार नाही. पाकिस्तान सरकारला हे चांगलेच माहिती आहे की हाफिज सईदविरुद्ध भारताचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. भारताने बऱ्याच काळापासून आमच्याविरुद्ध खोटे आरोप रचले आहेत. सरकारला याचे सत्य माहित आहे आणि ते कधीही असा निर्णय घेणार नाहीत. यावेळी त्याने दावा केला आहे की हाफिज सईद पाकिस्तान सरकारच्या संरक्षणाखाली पूर्णपणे सुरक्षित आणि आरामात राहत आहे.

Published on: Jun 06, 2025 03:27 PM