Pandharpur | पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट

Pandharpur | पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट

| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 8:18 AM

आज श्रावण शुध्द पुत्रदा एकादशी असल्याने  पंढरपूर येथील सावळ्या  विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. ही सजावट रांजणगाव येथील विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर  यांनी केली. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा सोळखांबी, चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागाना झेंडु, आष्टर, ग्लेंडर,  केशरी झेंडु, निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे, पिवळा झेंडु, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, ऑरकिड्स  अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे.

आज श्रावण शुध्द पुत्रदा एकादशी असल्याने  पंढरपूर येथील सावळ्या  विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. ही सजावट रांजणगाव येथील विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर  यांनी केली. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा सोळखांबी, चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागाना झेंडु, आष्टर, ग्लेंडर,  केशरी झेंडु, निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे, पिवळा झेंडु, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, ऑरकिड्स  अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे. यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. विठुरायाचे आजचे गोजिरे रुप अधिकच खुलून दिसत आहे.