Pankaja Munde :  वी सपोर्ट वाल्मिक आण्णा… भगवानगडावरील पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर्स!

Pankaja Munde : वी सपोर्ट वाल्मिक आण्णा… भगवानगडावरील पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर्स!

| Updated on: Oct 02, 2025 | 2:00 PM

भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी वी सपोर्ट वाल्मीक कराड चे बॅनर लक्ष वेधून घेत होते. तर माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, महादेवराव जाणकर यांच्यासह अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला भगवान भक्तीगडावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या मेळाव्यात वी सपोर्ट वाल्मिक कराडचे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वाद पेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. व्यासपीठावर विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांचे आगमन झाले. या प्रसंगी माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, महादेवराव जाणकर यांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले. तसेच माजी आमदार भीमराव धोंडे, आमदार नमिता मुंदडा, उमाताई खापरे आणि बाळराजे दादा पवार यांसारख्या अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख आणि प्रदेश प्रवक्ते रामजी कुलकर्णी यांचेही स्वागत झाले.

मेळाव्याला आलेल्या ऊसतोड संघटनेच्या वतीने आणि पाटोदा तालुक्याच्या वतीने पंकजा मुंडेंचे विशेष स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजकांनी व्यासपीठावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी उपस्थितांना खाली बसण्याची विनंती केली. या मेळाव्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.

Published on: Oct 02, 2025 02:00 PM