Special Report | ट्रोलर्सना पंकजा मुंडेंनी दिलेलं उत्तरही चर्चेत

| Updated on: Sep 02, 2021 | 11:53 PM

पंकजा मुंडेंचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडे गेल्यात. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिलीय. पंकजा मुंडे आईच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्यात.

Follow us on

राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे नेहमीच चर्चेत असतात. पंकजा मुंडे कुठे आहेत, काय करतात, याकडेच त्यांच्या कार्यकर्त्यांसह बऱ्याच जणांचं लक्ष असतं. सध्या पंकजा मुंडे या महाराष्ट्रात नाहीत, तर त्या बोस्टनला गेल्यात. पंकजा मुंडेंचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडे गेल्यात. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिलीय. पंकजा मुंडे आईच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्यात.

पंकजाताई, आमचं फक्त एवढचं म्हणणं…

पंकजा मुंडे यांच्या या पोस्टनंतर लक्ष्मण खेडकर नावाच्या एका व्यक्तीनंही एक फेसबुक पोस्ट केली. ते म्हणतात की, पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा परदेशात बोस्टनला शिक्षणासाठी पाठवलाय, अशी बातमी सोशल मीडियावर वाचली, आनंद वाटला, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये, त्यासाठी एक जबाबदार आई म्हणून पंकजाताई तुमचं खूप खूप अभिनंदन आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा मुलगा आर्यमनला ही मनापासून शुभेच्छा देतो. पंकजाताई, आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजुरांच्या नेत्या या नात्याने ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजुरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का? तेही जरा पाहा