Pankaja Munde | गोपीनाथ गडावरुन निघणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत

| Updated on: Aug 16, 2021 | 12:02 AM

कराड यांची जनआशीर्वाद यात्रा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी गोपीनाथ गडावरून निघत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र यावर आता पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.जोल

Follow us on

बीड / पऱळी : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad yatra) उद्यापासून (16 ऑगस्ट) सुरु होत आहे. ही यात्रा बीडमधील परळी येथील गोपीनाथ गडावरुन (Gopinath Gad) निघणार आहे. कराड यांची जनआशीर्वाद यात्रा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी गोपीनाथ गडावरून निघत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र यावर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि राजकीय नेत्यांचं अतूट नातं आहे. कराड यांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम आहे. ही मुंडे यांच्याविषयीची भावना आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. (Pankaja Munde says politicians have special bonding with Gopinath Munde therefore Bhagwat Karad starting his Jan Ashirwad yatra from Gopinath Gad)

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात मुंडे भगिनींना स्थान न दिल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती. याच चर्चेनंतर मुंडे भगिनींच्या समर्थकांनी राजीनामासत्र सुरु केले होते. राजीनामासत्रांचा एक अंक संपल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या यात्रेला गोपीनाथ गडावरून सुरुवात होणार आहे. पंकजा यांची नाराजी दूर करण्यासाठीच यात्रेची सुरुवात गोपीनाथ गडावरुन सुरु होत असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना “कराड यांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम व त्यांच्या विषयीची भावना आहे. त्यामुळेच कराड ही यात्रा गोपीनाथ गडावरुन काढत आहेत. गोपीनाथ मुंडे आणि राजकीय नेत्यांचं अतूट नातं आहे,” असं पंकजा यांनी म्हटलंय.

16 ते 21 ऑगस्टदरम्यान कराडांची यात्रा

भागवत कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या यात्रेची घोषणा केली आहे. “भव्य जनआशिर्वाद यात्रा… दि. 16 ते 21 ऑगस्ट 2021 , मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला”, असं ट्वीट भागवत कराड यांनी केलंय. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोंचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात गोपीनाथ मुंडे यांना त्यांनी ‘आमचं काळीज’ असं म्हटलंय. भागवत कराड आज केंद्रीय राज्यमंत्रीपदी विराजमान झाले असतील तर त्यामागे गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई असल्याचं लोक म्हणतात.

इतर बातम्या

‘तुम्ही नारळ फोडत राहा, उमेदवारी मला मिळो’, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांमध्ये मिश्कील टोलेबाजी

शहिदांच्या कुटुंबीयांचे पाय धुतले, नंतर चांदीच्या ताटात प्रेमाने घास भरवला, बच्चू कडू यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन

“इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि नाव कसं बदलता ?” औरंगाबादच्या नामांतरावरुन इम्तियाज जलील आक्रमक, वाद पुन्हा पेटणार?