पिक विमा योजनेत नवीन निकष; शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवली

पिक विमा योजनेत नवीन निकष; शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवली

| Updated on: Jul 30, 2025 | 7:15 PM

महाराष्ट्रातील फक्त २०-२२% शेतकऱ्यांनीच पीक विमा भरला आहे. सरकारने योजनेतील बदल केल्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपुष्टात आला आहे. परभणीत शेतकऱ्यांनी "मी पीक विमा भरणार नाही" अशी चळवळ सुरू केली आहे. पावसाअभावी पेरणी न झाल्यास विमा, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी २५% अग्रीम रक्कम, आणि काढणी नंतरच्या नुकसानीची भरपाई यासारख्या महत्त्वाच्या तरतुदी काढून टाकल्याने हा रोष निर्माण झाला आहे.

नजीर खान, प्रतिनिधी 

राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. पीक विमा भरण्याची मुदत संपत आली असतानाही केवळ 20 ते 22% शेतकऱ्यांनीच विमा भरल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी “मी पीक विमा भरणार नाही” अशी चळवळ सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने पीक विमा योजनेत अनेक बदल केल्याने शेतकऱ्यांचा या योजनेपासून विश्वास उडाला आहे. परभणीत काही शेतकऱ्यांनी या योजनेला थेट विरोध दर्शवत चळवळ सुरू केली आहे. नवीन योजनेत चार महत्त्वाचे ट्रिगर काढून टाकण्यात आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांनी विमा भरणे बंद केले आहे. यामध्ये पावसाअभावी पेरणी न झाल्यास विमा मिळण्याची तरतूद, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी 25% अग्रीम रक्कम, स्थानिक आपत्तीमुळे उभ्या पिकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण आणि काढणी पश्चात वैयक्तिक नुकसान भरपाई यांचा समावेश होता. हे बदल शेतकऱ्यांच्या नाराजीचे प्रमुख कारण ठरले आहेत.

Published on: Jul 30, 2025 07:15 PM