Pune : जिवंत सोडणार नाही… पालक शाळेत शिरले अन् विद्यार्थ्यांला लाथा बुक्क्यांनं मारलं, धक्कादायक CCTV बघितला?

Pune : जिवंत सोडणार नाही… पालक शाळेत शिरले अन् विद्यार्थ्यांला लाथा बुक्क्यांनं मारलं, धक्कादायक CCTV बघितला?

| Updated on: Sep 26, 2025 | 10:28 AM

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 24 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडला. फिर्यादी यांचा मुलगा झील शाळेत इयत्ता नववीला शिकत आहे. त्याचे शाळेतील काही मित्रांसोबत किरकोळ भांडण झाले होते. ते भांडण शाळेमध्येच मिटलं होतं. मात्र यातील एका विद्यार्थ्याने त्याच्या पालकांना ही गोष्ट सांगितल्यानंतर, त्याचे पालक थेट शाळेच्या आवारात शिरले

पुणे जिल्ह्यातील पौड गावात असणाऱ्या झील शाळेत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका पालकाने विद्यार्थांना शाळेत शिरून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून विद्यार्थ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी संबंधित पालकाने विद्यार्थांना प्रवेश शाळेच्या बाहेर या तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Published on: Sep 26, 2025 10:28 AM