Parth Pawar Land Deal :  ‘त्या’ गंभीर आरोपांनंतर पार्थ पवार गायब, अजित दादांकडून मात्र बचाव? नेमकं काय म्हणाले?

Parth Pawar Land Deal : ‘त्या’ गंभीर आरोपांनंतर पार्थ पवार गायब, अजित दादांकडून मात्र बचाव? नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 10, 2025 | 11:12 AM

पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवारांवर बचावात्मक भूमिका घेण्याची वेळ आली आहे. आरोपानंतर पार्थ पवार माध्यमांसमोर आले नाहीत. व्यवहारावर सही असलेला दिग्विजय पाटील आणि जमीन विकणारी शीतल तेजवानी गायब आहेत. या प्रकरणी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित जमीन घोटाळा प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे. या प्रकरणी आरोप झाल्यानंतर पार्थ पवार यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पार्थ पवारांचा बचाव करताना दिसत आहेत. या जमीन व्यवहारावर स्वाक्षरी करणारे दिग्विजय पाटील अजूनही पोलिसांना सापडले नाहीत. ज्या शीतल तेजवानी यांनी कथित सरकारी जमीन विकली, त्या परदेशात पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवारांनी या प्रकरणात कोणताही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, या प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चुकीची नोंदणी केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. विरोधकांनी या प्रकरणावरून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, या प्रकरणात पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे.

Published on: Nov 10, 2025 11:12 AM