पिंपरी-चिंचवडची लढत ठरली; राष्ट्रवादीकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी

| Updated on: Feb 07, 2023 | 10:32 AM

पिंपरी-चिंचवडची लढत ठरली आहे. राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Follow us on

पिंपरी-चिंचवडची लढत ठरली आहे. राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अश्विनी जगताप विरूद्ध नाना काटे असा सामना होणार आहे.  “चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे”, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.