PM Modi on Raigad Disaster | रायगडच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त, पंतप्रधान मोदींच मराठीतून ट्विट

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 4:56 PM

महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. काल दुपारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान रायगडच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून ट्विट केलं आहे. 