‘… सध्या देशात हेच घडतंय’; पंतप्रधान मोदी यांची स्टॅलिनशी तुलना, ‘सामना’तून काय केला हल्लाबोल?

| Updated on: Jun 04, 2023 | 9:26 AM

VIDEO | सामनाच्या रोखठोकमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्टॅलिनशी तुलना, काय केली टीका?

Follow us on

मुंबई : दैनिक सामना या वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह नव्या संसदभवनाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना स्टॅलिनशी करण्यात आली आहे. स्टॅलिन हट्टी, वर्चस्व गाजवणाऱ्या वृत्तीचा होता, असे सामनातून म्हटलं आहे. स्लॅलिननेच विरोधकांना संपवलं तर पोलीस आणि यंत्रणांचीही वापर केला. तर आपल्या देशातही सध्या हेच सुरू असल्याचं रोखठोमधून म्हटले आहे. ‘स्टॅलिनचे एक चरित्र वाचनात आले. स्टॅलिन हा कमालीचा हट्टी, दुराग्रही आणि इतरांवर वर्चस्व गाजवण्याच्या वृत्तीचा होता. तो त्याच्या मनाप्रमाणे धर्माचे अवडंबर माजवी, पण धर्म आणि परमेश्वर यापैकी कुणावरही त्याचा विश्वास नव्हता. स्टॅलिनच्या कारकिर्दीत त्याची खोटी चरित्रे लिहिली गेली. इतिहासही खोटा लिहिला गेला. 1905 च्या उठावात स्टॅलिनने शौर्य गाजवले अशा धादांत खोटय़ा कथा प्रसिद्ध झाल्या. स्टॅलिन हा साहसी, पराक्रमी होता याबाबत अनेक दंतकथा त्याच्या काळात रचल्या गेल्या व लोकांत पसरवल्या गेल्या. लेनिनची अनेक वचने स्टॅलिनने आपल्या सोयीप्रमाणे वापरली.

लेनिनच्या दृष्टीने स्टॅलिन हा एक नंबरचा बेमुर्वतखोर, सत्तापिपासू होता व लेनिनने तसे लिहून ठेवले. स्टॅलिनच नव्हे तर कोणाही नेत्याच्या हाती अनिर्बंध सत्ता येऊन तो मदांध होऊ नये ही लेनिनची इच्छा होती. 1923 साली एका डोंगराळ भागात झिनोव्हिव्ह बुखारीन, व्होरोशिलॉव्ह वगैरे नेते जमले व सामुदायिक नेतृत्व कसे आणावे यावर चर्चा सुरू केली, पण त्यांच्यात एकमत झाले नाही. बुखारीन त्यांच्यातून फुटला. पुढे बुखारीनला हाताशी पकडून स्टॅलिनने इतर नेत्यांचा काटा काढला. पुढे बुखारीनला काही काळ वापरून स्टॅलिनने त्याचाही काटा काढला. स्टॅलिनने विरोधकांना संपवले. त्यासाठी पोलीस व गुप्तचर यंत्रणांचा वापर केला. आज पुतिनही तेच करीत आहेत. आपल्या देशातही वेगळे काय घडते आहे!’