Ahmedabad Plane Crash : पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या दिशेने रवाना
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत. पंतप्रधान स्वत: याठिकाणी जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हा सध्याचा सर्वात मोठा विमान अपघात समजला जात आहे.
आज दुपारच्या सुमारास अहमदाबादच्या मेघानी येथे भीषण विमान अपघात झाला आहे. विमानतळावरून उड्डाण करताच 5 ते 10 मिनिटातच एअर इंडियाचं हे प्रवासी विमान कोसळलं आहे. 242 प्रवासी घेऊन जाणाऱ्या या विमानाला भीषण आग लागल्याने याठिकाणी उद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आरोग्य यंत्रानेशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: अहेमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.
Published on: Jun 12, 2025 04:38 PM
