Vaishanavi Hagawane : हगवणे माय-लेकाची धक्कादायक माहिती उघड, रचलेल्या कटात ‘या’ बँकेचे एजंट सहभागी?
हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. यामुळे आता हगवणे माय लेकाच्या अडचणी चांगल्याच वाढणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
जेसीबीचा अनधिकृत ताबा प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेले हे तिघे जण हे इंडसइंन बँकेचे एजंट असल्याची माहिती समोर आली आहे. इंडसइंन बँकेचे अधिकारी असल्याचं भासवत जेसीबी ताब्यात घेतला होता. यासह येळवंडे यांच्याकडून जेसीबी जप्त करणारे लोक हे हगवणे यांचे माणसं असल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे. हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं उघड झालं आहे. पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आली आहे. यासंदर्भात पुण्यातील पिंपरी चिंचवडचे डीसीपी शिवाजी पवार यांनी माहिती दिली आहे. हे तीन अटक केलेले अधिकारी प्रायव्हेट रिकव्हरी एजंट आहेत. तक्रारदार येळवंडे यांच्याकडून जेसीबी जप्त कऱण्यात आला होता. जेसीबी विक्री फसवणुकीत इंडसन बँकेने मोठा खुलासा केला. म्हाळुंगे पोलिसांनी काल बँकेच्या लीगल डिपार्टमेंटची चौकशी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
