Sanjay Shirsat | हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर संजय शिरसाट आक्रमक
MIM चे नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुंब्रा सोबत संपूर्ण राज्याला हिरवा करण्याच्या जलील यांच्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्याच्या वक्तव्याचा निषेध दर्शवला आहे.
MIM चे नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुंब्रा सोबत संपूर्ण राज्याला हिरवा करण्याच्या जलील यांच्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्याच्या वक्तव्याचा निषेध दर्शवला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलंय, जलील यांच्या वक्तव्याचा प्रत्येक समाज घटकाकडून विरोध होतोय. असे वक्तव्य करून त्यांची चाल काय हे लक्षात येतंय असं शिरसाट म्हणाले, हा देश कोणा एका धर्माचा नाही आहे, या देशाची संस्कृती जपायचं काम प्रत्येक भारतीय करतो, म्हणून जलील यांनी केलेलं वक्तव्य हे मुसलमान समाजाला देखील आवडलं नाही, असं म्हणत त्यांची मस्ती आणि गुर्मी आम्ही नक्कीच काढू असा थेट इशारा जलील यांना दिला आहे.
Published on: Jan 26, 2026 03:43 PM
