Special Report | महाराष्ट्रात झालेल्या हिंसाचारावरुन राजकीय भडका, मलिक VS भाजप

| Updated on: Nov 16, 2021 | 9:36 PM

पोलिसांनी सोमय्या यांना अमरावती दौरा रद्द करण्याची विनंती केली असली तरी सोमय्या मात्र अमरावती दौऱ्यावर ठाम आहेत. रझा अकादमीच्या मोर्चानंतर ज्या दुकानाची तोडफोड झाली, व्यापारांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या भेटीसाठी आपण अमरावती दौऱ्यावर येत असल्याचं पत्र सोमय्या यांनी अमरावती पोलिसांना पाठवलं आहे.

Follow us on

YouTube video player

मुंबई : त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. या हाकेला प्रतिसाद देत हिंदू संघटनांनी काढलेल्या मोर्चातही दगडफेक, तोडफोडीसारख्या घटना घडल्या. त्यामुळे अमरावतीमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून दहशतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, पोलिसांकडून सोमय्या यांनी अमरावती दौरा रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. पोलिसांनी सोमय्या यांना अमरावती दौरा रद्द करण्याची विनंती केली असली तरी सोमय्या मात्र अमरावती दौऱ्यावर ठाम आहेत. रझा अकादमीच्या मोर्चानंतर ज्या दुकानाची तोडफोड झाली, व्यापारांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या भेटीसाठी आपण अमरावती दौऱ्यावर येत असल्याचं पत्र सोमय्या यांनी अमरावती पोलिसांना पाठवलं आहे. मात्र, अमरवाती पोलीस आयुक्तांनी अमरावती शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने दौरा स्थगित करावा असं पत्र पाठवलं आहे. मात्र, सोमय्या दौऱ्यावर ठाम आहेत. आपण अमरावती दौऱ्यावर जाणार असून पीडितांची भेट घेणारच असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.