Special Report | मुंबईतील हवा दिल्लीपेक्षा जीवघेणी, प्रदूषणामुळं आजारांचा प्रादुर्भाव वाढणार

| Updated on: Nov 16, 2021 | 10:02 PM

विवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता 245 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली. मुंबईत दिवाळीच्या दिवसांमध्येही एवढी हवेची गुणवत्ता घसरली नव्हती.

Follow us on

YouTube video player

मुंबईः हिवाळ्यात थंड, निरोगी हवेमुळे वातावरण आरोग्यदायी ठरते. मात्र मुंबईत सध्या काहीचे विपरीत चित्र पहायला मिळत आहे. मुंबईत दिवसाच्या तापमानात अचानक वाढ झालेली दिसून येत आहे. दिवसाचे तापमान 35.2 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. अचानक वाढलेल्या तापमानासोबतच मुंबईच्या हवेची गुणवत्ताही घसरल्याचे दिसून येत आहे. रविवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता 245 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली. मुंबईत दिवाळीच्या दिवसांमध्येही एवढी हवेची गुणवत्ता घसरली नव्हती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेची गुणवत्ता 164 एक्यूआय आणि पाडव्याच्या दिवळी 221 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली होती.