Nitesh Rane | ‘हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस,’ जागोजागी नितेश राणेंच्या फोटोचे बॅनर, नवा वाद पेटणार?

Nitesh Rane | ‘हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस,’ जागोजागी नितेश राणेंच्या फोटोचे बॅनर, नवा वाद पेटणार?

| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 9:58 AM

गिरगावातील भाजप कार्यालयाशेजारीच नितेश राणे यांचे एक बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहण्यात आलीय. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीस एक कोंबडी बक्षिस म्हणून दिली जाईल असंही लिहण्यात आलंय.

मुंबई : संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जामीन फेटाळल्यानंतर कोकणात तसेच कणकवलीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तर दुसरीकडे जामिनासाठी आम्ही उच्च न्यायालयाचे दार ठोठवू अशी माहिती नितेश राणे यांच्या वकिलांनी दिली असून त्यांचा ठावठिकाणा अजूनही कोणाला लागलेला नाही. पोलीस त्यांचा शोध घेतच आहेत. या पार्श्वभूमीवर गिरगावातील भाजप कार्यालयाशेजारीच नितेश राणे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहण्यात आलीय. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीस एक कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाईल असंही लिहण्यात आलंय.