भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का, बडा नेत्याच्या गनिमी काव्याची चर्चा
भंडाऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे हे शरद पवार गटात सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भंडाऱ्यात पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आज होती. या बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक शरद पवार गटात...
भंडारा, २० मार्च २०२४ : अजित पवार गटाला भंडाऱ्यात मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. सध्या भंडाऱ्यात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक असलेल्या बड्या नेत्याच्या गनिमी काव्याची चांगलीच चर्चा होत आहे. भंडाऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे हे शरद पवार गटात सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भंडाऱ्यात पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आज होती. या बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार मधुकर कुकडे हे देखील हजर होते. त्यामुळे मधुकर कुकडे यांनी या बैठकीला लावलेली उपस्थिती म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांना हा जबर धक्का मानला जातोय. ‘ शरद पवार हे जगातील पहिले नेते आहेत ज्यांनी शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना खताचे भाव वाढले नाहीत. मात्र, आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळेच त्यांच्या विचारधारेसोबत आहे’, अशी प्रतिक्रिया कुकडे यांनी दिली.
