VIDEO : युतीत बिघाडी? मात्र प्रहारचा निर्धार पक्का! आधी लोकसभा त्यानंतर विधानसभेच्या रणांगणात उतरणार?

| Updated on: Jun 05, 2023 | 12:33 PM

महाराष्ट्रातून 15 विधानसभेच्या आणि 2 लोकसभेच्या जागा लढविणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांची घोषणाच केली आहे. त्यामुले आता युतीत बिघाडी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर यामुळे भाजपसह आता शिंदे गटात खळबळ उडाली आहे

Follow us on

सोलापूर : प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण ताकतीनिशी निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याचे याआधीच आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितलं होतं. त्याचबरोबर त्यांना अमरावतीवर आपला हक्क सांगितला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातून 15 विधानसभेच्या आणि 2 लोकसभेच्या जागा लढविणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांची घोषणाच केली आहे. त्यामुले आता युतीत बिघाडी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर यामुळे भाजपसह आता शिंदे गटात खळबळ उडाली आहे. प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी ही घोषणा करतानाच त्यांनी, आपला पक्ष आता जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका सुद्धा पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे सांगितलं आहे. तर अमरावती, विदर्भामध्ये सात ते आठ, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि दक्षिण सोलापूर विधानसभा, उत्तर महाराष्ट्रामध्ये दोन विधानसभा आणि एक लोकसभेची जागा लढवणार असल्याचेही सांगितलं आहे. तर आगामी काळात सोलापूर महानगरपालिका ही ताकतीने लढवू असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता सोलापुरमध्ये काँग्रेसपुढे नवे आव्हान उभे राहिलं आहे. याचबरोबर चौधरी यांनी पुन्हा एकदा बच्चू कडून यांचे शब्द युतीला आठवण करून देताना, जागा दिल्या तर सोबत लढू अन्यथा एकटे लढू असेही म्हटलं आहे.