जरांगे यांनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला…, काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
तुम्ही कर्जमाफी न देणाऱ्या सरकारला सत्तेवर बसवले मग आता का रडताय? तुम्ही पेरतात तेच उगवतं. शेतकऱ्यांनी आधी विचार करायला पाहीजे होता असा सल्लाही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एसटी दरवाढ प्रकरणी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.एसटी तोट्यात आहे म्हणून ही १५ टक्के दरवाढकेली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एसटी फायद्यात आली होती. महिला प्रवासी वाढले होता. महिन्याला ४० कोटी फायद्यात आली होती. त्यामुळे कुठल्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायचा असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांची माहिती खरी होती. एसटीत महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्यानंतर तोट्यात असलेले महामंडळ फायद्यात आले होते. भाजपाला मते देणाऱ्या जनतेला आपण एक सल्ला देणार आहोत, की आता पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यात रडायला तयार रहा असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मस्साजोग प्रकरणात मुंबईत मोर्चा निघत आहे. त्यासंदर्भात विचारले असता आंबेडकर म्हणाले की ज्यावेळी झाले त्यावेळी काहीच करायचे नाही, नंतर मोर्चे काढायचे याली मी ढोंग आणि धत्तुरा म्हणेल. देशमुख आणि सुर्यवंशी दोन्ही प्रकरणे भिन्न आहेत. देशमुख हत्या प्रकरणात सरकार मान्य करायला तयार नव्हते. तर सुर्यवंशी प्रकरणात आता कारवाई झालेली आहे. कोम्बिंग ऑपरेशन संदर्भात ज्युडिशियल इन्वायरी होणार आहे, एकच वादाचा मुद्दा राहीला होता की तो म्हणजे नुकसान भरपाईचा…सुर्यवंशी यांचे वय पाहाता ती व्यक्ती जीवंत असती तर किती कमवू शकते या नुसार नुकसान भरपाई आम्ही मागितली आहे. परंतू सरकारने अत्यंत तुटपुंजी भरपाई दिली. सरकारचा हा मार्ग चुकीचा आहे. त्यामुळे आम्ही मानवी हक्क आयोगाकडे ही केस घेऊन गेलो आहोत. शेतकऱ्यांना कर्जमाफीची जाहीरनाम्यातील मागणी पूर्ण झालेली नाही. याविषयी विचारले असता आंबेडकर म्हणाले की शेतकरी मुर्ख आहेत. मी मुर्ख यासाठी म्हणालो की त्यांनी पुन्हा सत्तेवर कुणाला आणले. जे सरकार कर्ज माफी करणार नाही. त्याच सरकारला तुम्ही निवडून आणले. मग आता का रडताय? तुम्ही पेरतात तेच उगवतं. शेतकऱ्यांनी आधी विचार करायला पाहीजे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मनोज जरांगे यांनी करीत पुन्हा उपोषण केले आहे. त्यावर ते म्हणाले की हा वाद आता धस व्हर्सेस जरांगे पाटील असा झाला आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले पण भाजपाला टार्गेट केले नाही. जी भाजपा तुम्हाला ओबीसी प्रमाणपत्र द्यायला तयार नव्हती त्यांनाच तुम्ही सत्तेवर बसवले आहे असेही आंबेडकर यांनी भाजपा धार्जीणी भूमिका घेणाऱ्या जरांगे यांनी सुनावले आहे.
