“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बंधनकारण, पण… “, सत्तासंघर्षावरच्या निर्णयावर आंबेडकरांची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 28, 2022 | 11:14 AM

वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Follow us on

गिरीश गायकवाड, TV9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला. तो सर्वांना बंधनकारण राहील पण त्याचा आदर होईल का? याबद्दल मला शंका आहे. निवडणूक आयोगावर कुणीही शिंतोडे उडवता कामा नये, यासाठी संविधानाने आणि संसदेनं कायम खबरदारी घेतली. कलम 15 हे संविधानिक आहे की नाही, यावर भाष्य करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) एक संधी होती. पण तसं झालं नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. तसंच काल न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं पुनर्विलेकन करणयाची मागणी आंबेडकरांनी केली आहे.