मनसेला सोबत घेऊन मुंबईतील सहकार क्षेत्राची दिशा बदलण्याचा प्रयत्न : प्रसाद लाड-
महापालिका निवडणुकीत एकत्र यायचं की नाही याचा निर्णय राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच घेतील, असं सूचक विधान भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केलं.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. त्यांच्याशी मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. जेव्हा दोन नेते एकत्र भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होतेच. तशी आमच्यातही झाली, असं सांगतानाच महापालिका निवडणुकीत एकत्र यायचं की नाही याचा निर्णय राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच घेतील, असं सूचक विधान भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केलं.
Published on: Dec 08, 2021 12:42 PM
