BJP चे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार : Prashant Jagtap-TV9

BJP चे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार : Prashant Jagtap-TV9

| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 8:17 PM

पुण्यात भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असा खळबळजनक दावा पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्य प्रशांत जगताप यांनी केला आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असाही दावा जगताप यांनी केला आहे.

पुणे : पुण्यात भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असा खळबळजनक दावा पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्य प्रशांत जगताप यांनी केला आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असाही दावा जगताप यांनी केला आहे. तसेच या नगरसेवकांची प्रशांत जगताप यांच्याशी बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ माजली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत जगताप यांनी केलेल्या या दाव्याने पक्षांतरांच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसातच पुणे महापालिकेसह इतर मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. प्रशांत जगताप यांचा हा दावा खरा ठरल्यास आगामी निवडणुकीत भाजपची चिंता वाढू शकते, मात्र प्रशांत जगताप यांनी याआधीही असा दावा केला आहे, त्यामुळे हा दावा यावेळी तरी खरा ठरणार की गेल्या वेळेसारख्या फक्त चर्चा रंगणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.