Pravin Darekar यांना धक्का, मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Pravin Darekar यांना धक्का, मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 6:54 PM

मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी प्रविण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी प्रविण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबईत आपच्या धनराज शिंदे यांच्या तक्रारीनंतर प्रविण दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर, तिथं मुंबई उच्च न्यायालयात प्रविण दरेकर यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यांना सत्र न्यायालयात जाण्यास सांगण्यात आलं होतं. यानंतर प्रविण दरेकर सत्र न्यायालयात गेले होते. तिथं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. पोलिसांनी प्रविण दरेकरांना कोठडीत घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याची बाजू मांडली होती.