Akkalkot News : छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..; संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना फासलं काळं!

Akkalkot News : छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..; संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना फासलं काळं!

| Updated on: Jul 13, 2025 | 4:42 PM

Solapur News Updates : अक्कलकोट येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

अक्कलकोट येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान काळे फासण्यात आले. ही घटना शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घडवल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर असताना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमस्थळी पोहोचताच काही व्यक्तींनी एकत्र येत त्यांच्या चेहऱ्यावर काळे फासले. हे लोक शिवधर्म फाउंडेशनशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. गायकवाड यांनी त्यांच्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने आणि स्वामी समर्थांचा अवमान केल्याचा आरोप करत शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. यापूर्वीही या संघटनेने संभाजी ब्रिगेडविरोधात उपोषण केले होते.

प्रवीण गायकवाड हे दुसऱ्या संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष असून, ते महाराष्ट्रभर विविध दौरे करतात. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला असून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Published on: Jul 13, 2025 04:42 PM