Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात; वातावरणात गारवा वाढला

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात; वातावरणात गारवा वाढला

| Updated on: May 25, 2025 | 12:17 PM

Sambhajinagar Rain News : राज्यात अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवायला लागला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेtली आहे. गेल्या तासाभरापासून शहरपरिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाने संभाजीनगरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याने ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना हा पाऊस दगा देईल का? अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटत आहे.

राज्यात लवकरच मान्सून दाखल होणार आहे. तत्पूर्वी अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उन्हाळी पिकांना फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यानंतर आता संभाजीनगर शहरात आणि जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने आज हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवायला लागला आहे. शेतकऱ्यांना मात्र या पावसाने चिंता जाणवायला लागली आहे. ऐन हंगामात पाऊस पेरणीच्यावेळी दडी मारेल का अशी चिंता आता शेतकऱ्यांना वाटत आहे.

Published on: May 25, 2025 12:13 PM