Beed flood : गर्भवती महिलेला पुराने घेरलं, मृत्यूच्या दाढेतून जवानांनी काढलं बाहेर; पहा थरारक व्हिडीओ

Beed flood : गर्भवती महिलेला पुराने घेरलं, मृत्यूच्या दाढेतून जवानांनी काढलं बाहेर; पहा थरारक व्हिडीओ

| Updated on: Sep 23, 2025 | 3:12 PM

महाराष्ट्रातील बीड आणि परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी, सिंधफणा आणि मांजरा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बीडच्या माजलगावमधील सांडस चिंचोली येथे पुरात अडकलेल्या गर्भवतीचे एनडीआरएफने सुखरूप बचाव केला.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आले आहेत. गोदावरी, सिंदफणा आणि मांजरा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीकाठच्या अनेक गावांना पूरग्रस्त केले आहे. जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आल्याने नदीपात्रात पाणी वाढले आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावात पुरात अडकलेल्या गर्भवतीला एनडीआरएफच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. परभणी जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली असून, सेलू तालुक्यात घरात पाणी शिरले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील सांगोबा येथील आदिनाथ महाराज मंदिराला पूराचा वेढा पडला आहे. अनेक ठिकाणी अन्नधान्याचे आणि शालेय साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

Published on: Sep 23, 2025 03:12 PM