राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याची पुण्यात लगबग, मुंबईतील सभेची कशी सुरूये तयारी?

| Updated on: Mar 19, 2023 | 5:19 PM

VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याची पुण्यात जय्यत तयारी, शक्तिप्रदर्शन करत पुण्यातील कार्यकर्ते मुंबईत होणार दाखल

Follow us on

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेच्या मुंबईतील २२ मार्च रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याची पुण्यात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करत मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्करवर दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात कार्यकर्त्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. दरम्यान, पुण्यातील मनसे कार्यकर्ते यांनी पुणे शहर कार्यालयात एकत्र येत गुढीपाडवा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे. अशातच आता पुण्यासह राज्यभरातील मनसैनिकांचं लक्ष हे गुढीपाढवा मेळाव्याकडे लागले असून या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार, कोणतं मार्गदर्शन करणारं, आणि ठाकरी तोफ आता कुणावर धडाडणार हे पाहण्याची उत्सुकता देखील सर्वांना आहे. मनसेकडून पुणे शहरात वातावरण निर्मितीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी पुणे मनसेच्या शहर कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या सभेसाठी मेगा प्लॅन तयार करण्यात आला असून राज ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी पुण्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.