Hingoli Rain | हिंगोलीत मुसळधार पावसाची हजेरी, हजारो हेक्टर शेतीचं नुकसान
हिंगोली जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. हिंगोली शगरातील बावन्न खोली, रेल्वे फाटक पूल परिसरात रस्त्यावरुन पाणी वाहत आहेत. तर वसमत, औंढा, कळमनुरी, सेनगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय.
हिंगोली जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. हिंगोली शगरातील बावन्न खोली, रेल्वे फाटक पूल परिसरात रस्त्यावरुन पाणी वाहत आहेत. तर वसमत, औंढा, कळमनुरी, सेनगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. वसमत तालुक्यातील टेंभुर्णी, केन्होळा गावात पाणी शिरलं. अनेक घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यातील कयाधू नदी धोका पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पैनगंगा नदीत्या पात्रात इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं पैनगंगा नदीला पूर आलाय. जिल्ह्यात सततच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीनच्या उभ्या पिकाला जागेवरच अंकुर फुटू लागले आहेत.
