समान नागरी कायद्यावरून मोदी यांची विरोधकांवर टीका, उद्धव ठाकरे यांची दोनच प्रतिक्रिया, म्हणाले…
समान नागरी कायद्यावरून विरोधकांवर टीका केली होती. मोदी यांनी, ‘मुस्लिमांना कोणते राजकीय पक्ष भडकवत आहेत हे समजून घेतले पाहिजे. समान नागरी कायद्यावरून सध्या ते मुस्लिमांना चिथावणी देत आहेत त्यामुळे एकाच घरात दोन वेगवेगळे कायदे असू शकत नाहीत. तर तेच घर अशा दोन कायद्यामुळे कसे चालेल असा सवाल त्यांनी केला आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर येताच त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याचबरोबर त्यांनी समान नागरी कायद्यावरून विरोधकांवर टीका केली होती. मोदी यांनी, ‘मुस्लिमांना कोणते राजकीय पक्ष भडकवत आहेत हे समजून घेतले पाहिजे. समान नागरी कायद्यावरून सध्या ते मुस्लिमांना चिथावणी देत आहेत त्यामुळे एकाच घरात दोन वेगवेगळे कायदे असू शकत नाहीत. तर तेच घर अशा दोन कायद्यामुळे कसे चालेल असा सवाल त्यांनी केला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाकडून समान नागरी कायदा आणा असे सांगण्यात येत. मात्र फक्त व्होटबँक कडे पाहणाऱ्या लोकांकडून समान नागरी कायद्याला विरोख केला जात असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावर पत्रकारांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला असता त्यांनी यावर फक्त दोन शब्दात उत्तर दिलं आणि ते मार्गस्थ झाले. त्यांनी यावर आपण योग्य वेळ आल्यावर बोलू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
