Prithviraj Mohol : ‘मी शिवराज राक्षेला चितपट केलं, माझा डाव 100 टक्के…’, महाराष्ट्र केसरी पहिलवानाचं मोठं वक्तव्य

Prithviraj Mohol : ‘मी शिवराज राक्षेला चितपट केलं, माझा डाव 100 टक्के…’, महाराष्ट्र केसरी पहिलवानाचं मोठं वक्तव्य

| Updated on: Apr 15, 2025 | 1:06 PM

'माझा डाव यशस्वी होता. मी खेळाडू आहे माझं काम एकच आहे लढणं... माझा डाव १०० टक्के खरा होता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय. मी शिवराज राक्षेला चितपट केलं, महाराष्ट्र केसरीचा मी खरा विजेता आहे', असंही पृथ्वीराज मोहोळ याने म्हटलंय.

अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटू शिवराज राक्षे विरूद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामन्यात तगडी लढत झाल्याचे पाहायला मिळाले होती. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा विजयी ठरला होता. त्यानंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा पंचांनी दिलेल्या निकालावर अनेक प्रतिक्रिया आल्याचे पाहायला मिळाल्या होत्या. पंचांनी दिलेल्या निर्णयावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या चौकशी समितीने आता पंचांना दोषी ठरवले आहे. तर त्या पंचांना तीन वर्षांसाठी निलंबित कऱण्यात आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी माझी कुस्ती निकाली काढली होती. मी डाव मारून मोकळा झालो होता. पण शिवराज राक्षेची प्रतिक्रिया नव्हती’, असं पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने म्हटलं आहे. पुढे तो असंही म्हणाला की, मी अंतिम फेरीत डाव मारून मोकळा झालो. पंचांनी शिट्टी देखील मारली… तर पंचांनी शिट्टी मारल्यानंतर खेळाडू काय करणार? असा सवाल देखील पृथ्वीराज मोहोळ याने उपस्थित केला आहे. पुढे त्याने असंही म्हटलं की, २ सेंकद शिट्टी मारली नसती तर डाव मी जिंकला असता.

Published on: Apr 15, 2025 01:06 PM