Pune NCP : अखेर ठरलं ! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, महापालिका निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर; इतिहास घडणार?
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र लढणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रयत्नांमुळे ही युती शक्य झाली असून, दोन दिवसांत अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. सुभाष जगताप, चेतन तुपे, सुनील टिंगरे, अंकुश काकडे, विशाल तांबे आणि वंदना चव्हाण यांसारखे प्रमुख नेते यासाठी सकारात्मक आहेत.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती होणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून होते आणि दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही गट एकत्र लढण्यास सहमत झाले आहेत. या बैठकीत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, आमदार चेतन तुपे आणि सुनील टिंगरे हे उपस्थित होते. शरद पवार गटाकडून अंकुश काकडे, विशाल तांबे आणि वंदना चव्हाण यांनी सहभाग घेतला. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी युतीसाठी सकारात्मकता दर्शवली आहे. येत्या दोन दिवसांत युतीची अधिकृत घोषणा केली जाईल आणि २५ किंवा २६ तारखेला उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल असे सांगितले जात आहे.
Published on: Dec 23, 2025 05:05 PM
