Pune : त्यानं तिला एकांतात घेरलं अन् मारली मिठी, मंत्र देण्याच्या नावाखाली ज्योतिषानं जे केलं ते संतापजनक

Pune : त्यानं तिला एकांतात घेरलं अन् मारली मिठी, मंत्र देण्याच्या नावाखाली ज्योतिषानं जे केलं ते संतापजनक

| Updated on: Jul 20, 2025 | 3:54 PM

पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहकारनगर पोलिसांनी अखिलेश लक्ष्मण राजगुरु या भोंदू ज्योतिषाला विनयभंगप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणी अखिलेश राजगुरू याला सहकार नगर पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

पुण्यात एका तरूणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न ज्योतिषाकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याच्या धनकवडी भागातील या संतापजनक घटनेनंतर पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या तरूणीला एकांतात बोलावून मंत्र देण्याऐवजी ज्योतिषाकडून या तरूणीवर विनयभंगाचा प्रयत्न करण्यात आला. तर या ज्योतिषाने पत्रिका पाहून भविष्य सांगतो असा दावा केला होता. हा दावा करणाऱ्या ज्योतिषाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील धनकवडी भागातील राजधानी अपार्टमेंट श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय येथे हा संतापजनक प्रकार घडला. या भोंदू ज्योतिषाचं नाव अखिलेश राजगुरू असं असून त्याचं वय ४५ वर्ष आहे. याबाबत २५ वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीच्या मैत्रिणीने या ज्योतिषाकडे जाऊन भविष्य पाहण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार फिर्यादीने १२ जुलै २०२५ रोजी भावाची पत्रिका या ज्योतिषाकडे नेली. पत्रिका पाहिल्यानंतर “भावाला एक वनस्पती द्यायची आहे, ती घेऊन या,” असे सांगण्यात आले. १८ जुलै रोजी वनस्पती आणायला सांगितल्यानंतर १९ जुलै रोजी फिर्यादी धनकवडी येथील कार्यालयात गेल्या असता “वनस्पती डोक्यावर ठेवून मंत्र म्हणावे लागतील,” असे ज्योतिषाने सांगितले. मात्र त्यावेळी फिर्यादी यांना संशय आल्याने त्या निघू लागल्या, तेव्हा अचानक अखिलेश राजगुरुने त्यांना मिठी मारून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

Published on: Jul 20, 2025 03:52 PM