Pune Pregnant Death Case : पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; तिसरा अहवाल सरकारला सादर, नेमकं काय म्हटलंय?
भिसे कुटुंबीयांकडून कऱण्यात आलेल्या मागण्यांमध्ये डॉ. घैसास यांना तत्काळ बडतर्फ करून त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, डॉ. घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. रूग्णाची खासगी माहिती लीक करणाऱ्यांवर कारवाई करावी, रूग्णाची खासगी माहिती लीक करणाऱ्यांचे लायसन्स रद्द करावे आणि ससून रूग्णालय समितीने पोलीस विभागाला त्वरीत अहवाल द्यावा.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी तिसरा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. मंत्रालयात माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पुणे महानगर पालिकेकडून माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सरकारपुढे सादर करण्यात आला आहे. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी तीन अहवाल सादर झाल्यानंतर राज्य सरकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनावर कोणती कारवाई करणार का? डॉ.सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, भिसे कुटुंबीयांकडून नुकतीच एक प्रेस नोट जाहीर केली आहे. यामध्ये भिसे कुटुंबीयांकडून पाच मागण्या करण्यात आल्या आहेत. तर या तिसऱ्या अहवालातून नेमकं काय समोर आलंय?
